नांद्रे / प्रतिनिधी
नांद्र्यातील वंचित पूरग्रस्तांच्या सानुगुह अनुदान कामकाज उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी सांगली अप्पर तहशिलदार विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालावरती चर्चा करण्याकरिता १७-०५-२०२२ ला वंचित पूरग्रस्तांचे नांद्रे ग्रामपंचायत सदस्य मोहसीन मुल्ला यांना बोलावले होते. त्यावेळी मंडल अधिकारी यादव हे हि उपस्थित होते. पूरग्रस्तांच्या अडचणीवर चर्चा झाली. यामध्ये पूरग्रस्तांना वंचित ठेवण्यात दोष तात्कालीन तलाठी महावीर सासणे यांचाच आहे असे एकमत झाले.
या चर्चेचा वृत्तांत महावीर सासणे यांना कळाला असता ते लगेच दुसऱ्याच दिवशी सकाळी 11.30 ला नांद्रे येथील तलाठी कार्यालयामध्ये कार्यरत तलाठी स्वप्निल शिंदे यांच्याच खूचीवर बसून वंचित पूरग्रस्तांच्या अवहालावरील होणारी कारवाई संदर्भात वाद घातला. पूरबांधीत प्रभागचे ग्रामपंचायत सदस्य मोहसीन मुल्ला यांच्याशी आरेरावीची भाषा केली. “हा विषय तात्काळ इथल्या इथे थांबव. मी कोण आहे तुला अजून माहीत नाही. माझे नेटवर्क खूप मोठे आहे. विनाकारण तुला ञास होईल. जास्त शाहणपणा केलास तर कोणत्या तरी भानगडीत तुझं नाव गुंतवून तुझ्या आयुष्याचे वाटोळे करीन. माझ्यावर कोणती कारवाई झाली तर मी तुला सोडणार नाही. अशी भाषा करत कबरेला बाळगत असलेले पिस्तूल दाखवत मला जीवे मारण्याची धमकी तात्कालीन तलाठी महावीर सासणे यांनी दिली. असे मत पूरबांधीत प्रभागचे सदस्य मोहसीन मुल्ला यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना दिली. सासणेच्या अश्या वागण्याने नांद्रेयात खळबळ माजली आहे.
मोहसीन मुल्ला पुढे म्हणाले, सासणे यांच्या कारकिर्दीत दोन वेळेस महापूर, कोरोना, ढगफुटी, अतिवृष्टी झाली असता त्यांना नांद्रेयातील अनेक पूरग्रस्तांना वंचित ठेऊन अनेक बोगस पूरग्रस्तांच्या नावे शासनाचे अनुदान लाटले आहे. या त्यावेळेस वंचित पूरग्रस्तांची बाजू मांडण्यासाठी तलाठी कार्यालयात ग्रामपंचायत सदसय अरविंद कुरणे गेले असता त्यांना हि जातीवाचक शिविगाळ करत पिस्तूलाचा धाक दाखवून कार्यालयाबाहेर काढण्यात आले. त्यांच्याकडे असलेल्या पिस्तूलाची परवानगी आहे किंवा नाहि या बाबत हि चौकशी व्हावी. तसेच प्रशासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आशी लेखी मागणी मुख्यमंञी, उपमुख्यमंञी, गुहमंञी, महसूल मंञी, पालकमंञी, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, विपविभागीय अधिकारी यांच्याकडे करण्यात आली असून या कालावधीत माझ्या जिवितास काही झाल्यास तलाठी महावीर सासणे यांनाच जबाबदार धरण्यात यावे असे मत मोहसीन मुल्ला व्यक्त केले आहे.