दिसपूर, 18 मे :आसामममधील (Assam News) अनेक जिल्ह्यात पुराचा कहर पाहायला मिळत आहे. आसाममध्ये आलेल्या पुरामुळे 20 जिल्ह्यातील तब्बल 2 लाख लोक प्रभावित झाले आहेत. सातत्याने कोसळणारा पाऊस, भूस्खलन आदी कारणांमुळे रेल्वे आणि रस्त्यांचा संपर्क तुटला आहे.
दरम्यान या संदर्भातील पूल तुटून वाहून गेल्याचा एक व्हिडीओ आसाममधील असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र तो व्हिडीओ इंडोनेशीयाचा असल्याचं समोर आलं आहे. तो व्हिडीओ आसाममधील नसून इंडोनेशियातील जुना व्हिडीओ असल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. इंडोनेशिया आणि पूर्व तिमोरमध्ये पूर आणि भूस्खलन झाल्याचा हा व्हिडीओ एप्रिल 2021 मधला आहे. आसाम मधील पूर परिस्थिती नंतर हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल करण्यात आला आहे.