ऑनलाइन टिम : मुंबई
आपल्या स्वतःच्याच मुलीच्या म्हणजे शीना बोराच्या खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या इंद्राणी मुखर्जीला आज सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला. ६ वर्षांपासून तुरुंगामध्ये असल्याच्या सबबीवरून कोर्टाने हा जामीन मंजूर केला. २०१५ रोजी घडलेल्या या हत्याकांडाने साऱ्या देशाला हादरवून सोडले होते. इंद्राणीने सुरुवातीला हा मृतदेह आपल्या बहिणीचा असल्याचे सांगितले होते. परंतु तपासाअंती सदरचा मृतदेह हा तीच्या मुलीचा म्हणजे शीना बोराचा असल्याचे सिद्ध झाले.
२०१५ ला शीना बोरा हत्याकांड घडले होते. इंद्राणीच्या ड्रायव्हरच्या जबाबावरून इंद्राणी मुखर्जीला अटक करण्यात आली होती. मध्यंतरीच्या काळात आपली मुलगी शीना जिवंत असून ती काश्मीर मध्ये असल्याने पोलिसांनी तिचा तपास करावा असे खळबळजनक वक्तव्य इंद्राणीने केले होते. इंद्राणीने तपासामध्ये आपण दोन लग्न केल्याचे आणि शीना आपल्या पहिल्या पतीपासून झालेली मुलगी असल्याचे सांगितले होते. इंद्राणीला मिळालेल्या जामीनामुळे या केस ला वेगळी नाट्यमय कलाटणी मिळाली आहे.