खानापूर परिसरात पेरणीपूर्व शेती मशागतीच्या कामांना पोषक, उन्हाळी पिकांना दिलासा
वार्ताहर /चापगाव
मंगळवारी दुपारच्या सुमारास खानापूर तालुक्मयात वळिवाच्या पावसाने सुसाट वाऱयासह जोरदार तब्बल दीड तास पाऊस झाला. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. या पावसाने उन्हाळी पिकांना दिलासा मिळाला आहे.
सोमवारपासून वातावरणात कमालीचा उष्मा जाणवत होता. मंगळवारी दुपारी 2 नंतर विजेच्या गडगडाटासह तासाहून अधिक काळ वळिवाच्या पावसाने झोडपून काढले. खानापूर तालुक्मयाच्या पूर्व-मध्य भागामध्ये पाऊस झाला. तालुक्मयाच्या पूर्व भागातून जोराचा वारा व गारांचा पाऊस झाला. कोडचवाड, चापगाव, बेकवाड, खानापूर, गर्लगुंजी, पारिश्वाड आदी भागात जोराचा पाऊस झाला. मंगळवारी झालेल्या पावसाने शेतकरी वर्गामध्ये समाधान पसरले आहे. यावषीचा मान्सून हंगाम वेळेत सुरू होण्याची शक्मयता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे पेरणीपूर्व मशागतीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शेतामध्ये ओलाव्याची गरज होती. खरीप हंगाम आता पंधरवडय़ावर आला आहे. पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करण्यासाठी शेतकरी कामाला लागणार आहे.
मंगळवारी दुपारी झालेल्या पावसामुळे खानापूर बाजारपेठेवरही मोठा परिणाम झाला. बाजारपेठेत गटारातील पाणी रस्त्यावरून वाहू लागल्याने अनेकांची गैरसोय झाली. येथील नवीन मासळी मार्केटजवळ रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनधारकांना वाट काढताना कसरत करावी लागली. सदर मासळी मार्केटजवळ खोलगट भाग असल्याने गुडघाभर पाणी साचल्याने खड्डय़ांचा अंदाज येत नसल्याने वाहनधारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे.









