प्रतिनिधी /वास्को
वास्कोतील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून फरार झालेल्या संशयीत आरोपीला वास्को पोलिसांनी मंगळवारी सकाळी केरळहून गोव्यात आणले. त्याला पोलिसांनी अटक करून पोलीस कोठडीत ठेवले आहे. बिहार, आंद्र प्रदेश, तामिळनाडू व केरळ असा हजार किलो मिटरपर्यंत पाठीलाग वास्को पोलिसांच्या पथकाने पाच दिवसांत संशयीत आरोपीला गजाआड केले.
मुळ बिहारी असलेल्या मन्जीत कुमार या एकवीस वर्षीय युवकाने वास्कोतील एका अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तीच्या लैंगिक अत्याचार केले होते. फेब्रुवारी महिन्यात ही घटना घडली होती. मात्र या प्रकरणानंतर हा युवक गायब झाला होता. त्याच्याविरूध्द सहा दिवसांपूर्वीच पोलीस तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून त्याला केरळमध्ये सोमवारी ताब्यात घेतले. हा संशयीत आरोपी विविध राज्यात फिरून पोलिसांनी गुंगारा देत होता. त्याचा ठावठिकाणा शोधण्यासाठी वास्को पोलिसांचे एक पथक राज्याबाहेर गेले होते. बिहार, आंद्र प्रदेश, तामिळनाडून व केरळपर्यंत त्याचा पाठलाग करीत या पोलिसांच्या पथकाने सुमारे 6 हजार किलो मिटर प्रवास केला. केरळमध्ये त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. मंगळवारी सकाळी त्याला वास्को पोलीस स्थानकावर आणण्यात आले. तक्रार आल्यानंतर केवळ पाच दिवसांत संशयीत आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले. वास्को पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहे.









