949 रुपयाच्या तुलनेत 867 रुपयावर समभाग नेंदणीकृत ः बाजारमूल्यात 5 वी सर्वात मोठी कंपनी
मुंबई
एलआयसीच्या समभागांच्या लिस्टिंगवर सवलत मिळण्यासोबत राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) एलआयसीचे समभाग 77 रुपये म्हणजे 8.11 टक्के घसरण होत तो 872 रुपयावर नोंदणीकृत झाला आहे. तसेच दुसऱया बाजूला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 867 रुपयावर समभाग नेंदणीकृत झाला आहे. सरकारने एलआयसीमधील आपली जवळपास 3.5 टक्के हिस्सेदारी विकून जवळपास 21,000 कोटी रुपये प्राप्त केले आहेत.
यामध्ये इश्यू 2.95 पट सबस्क्राइब झाला होता. इश्यूची प्राईस बँड 949 रुपये होती. म्हणजे यात ज्या गुंतवणूकदारांना समभागांमध्ये सवलत मिळाली नाही त्यांना बीएसईवरील किमतीच्या हिशोबात प्रती समभाग 82 रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. लिस्टिंग प्राईसच्या हिशोबात एलआयसीचे बाजारमूल्य 5.48 लाख कोटी रुपयांवर राहिले. यासोबतच कंपनी देशातील सर्वात मोठी पाचव्या नंबरची मौल्यवान कंपनी बनली आहे.
एलआयसीच्या पुढे असणाऱया कंपन्या
एलआयसी 6.02 लाख कोटीसोबत पाचवी सर्वात मोठी मौल्यवान कंपनी ठरली आहे. मात्र एलआयसीच्या पुढे मुकेश अंबांनी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस दुसऱया स्थानी आहे. एचडीएफसी बँक व इन्फोसिस या कंपन्यांचा यामध्ये समावेश झाला आहे.
गुंतवणूकदारांना किती नुकसान?
पॉलिसीधारकांना ः एलआयसीने 15 समभागांचा लॉट केला होता. यामध्ये गुंतवणूकदारास 60 रुपयांची सवलत म्हणजे एक समभाग(949-60)889 रुपयांना प्राप्त होणार आहे. यामध्ये हिशोब बघितल्यास 889 गुणिले 15 बरोबर 13,335 रुपयांमध्ये 1 लॉट म्हणजे 15 समभाग मिळाले. बीएसईवर समभाग 867 रुपयांवर लिस्ट झाले आहेत. म्हणजे पॉलिसीधारकांना लिस्टिंगवर प्रति समभाग 22 रुपयाचे नुकसान झाले व 1 लॉटवर 330 रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद केली आहे.
किरकोळ व कर्मचारी वर्ग ः यामध्ये जर किरकोळ आणि कंपनीचे कर्मचारी असल्यास आयपीओकरीता अर्ज केल्यास यामध्ये गुंतवणूकदारांना 45 रुपयांची सवलत मिळाली म्हणजे 1 समभाग (949-45) 904 रुपयांना मिळाला आहे. या हिशोबात 904गुणिले 15 बरोबर 13,560 रुपयामध्ये 1 लॉट म्हणजे 15 समभाग मिळाले. दुसऱया बाजूला बीएसईवर समभागात 867 रुपयांवर समभाग लिस्ट झाले आहेत. म्हणजे किरकोळ व कर्मचाऱयांना लिस्टिंगवर प्रति समभाग 37 रुपये नुकसान झाले. म्हणजे 1 लॉट याप्रमाणे 555 रुपयाचे नुकसान झाले आहे.









