नवी दिल्ली / वृत्तसंस्था
बायोलॉजिकलöई लिमिटेडने कोर्बेव्हॅक्स लसीची किंमत प्रतिडोस 250 रुपये केली असून सर्व करांसह लाभार्थींना ती 400 रुपये प्रतिडोसमध्ये मिळेल. सध्या त्याची किंमत 840 रुपये आहे. सध्या ग्राहकांना ती 990 रुपयांना मिळत आहे. 12 ते 14 वयोगटातील मुलांना कोर्बेव्हॅक्सची लस दिली जात आहे. मार्चमध्ये सरकारने त्याची किंमत सरकारी केंद्रांसाठी 145 रुपये निश्चित केली होती. सामान्य लोकांसाठी लस अधिक परवडणारी बनवण्यासाठी आणि शक्मय तितक्मया मुलांसाठी ती उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने औषधाची किंमत कमी केली आहे. या लसीमुळे कोरोना व्हायरसविरुद्धची लढाई अधिक प्रभावीपणे लढली जाईल, असा दावा बायोलॉजिकल-ई कंपनीने केला आहे. यापूर्वी मे महिन्याच्या सुरुवातीला सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने 12-17 वर्षे वयोगटातील मुलांच्या कोविड-19 लसीकरणासाठी मंजूर केलेल्या कोवोव्हॅक्सच्या किमती कमी केल्या.









