नवी दिल्ली
इलेक्ट्रिक वन आणि आयपॉवर बॅटरीज यांनी एकत्रित येत आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 500 इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी चेकअप व बदली केंद्रांची स्थापना करण्याचे नियोजन केले आहे. ही केंद्रे इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीची तपासणी करतील व आवश्यक वाटल्यास लिथीयम आयन बॅटरी बदलून देण्याची व्यवस्थाही या केंद्रांवर होईल.
देशभरात येणाऱया काळात 500 अशी सेवा केंद्रे सुरु केली जाणार असून त्याकरीता पडताळणी करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
यांना मिळणार सेवेचा लाभ
विविध इलेक्ट्रिक दुचाकी कंपन्यांच्या वाहनांकरीता ही केंद्रे सेवा देतील, असे दोन्ही कंपन्यांकडून सांगितले जात आहे. हिरो इलेक्ट्रिक, ओकीनावा, ऍम्पीअर, बेनलिंग, कायनेटीक व ओकाया आदी कंपन्यांना ही केंद्रे सेवा देतील, असे सांगितले जाते.









