नृसिंहवाडी / प्रतिनिधी
येथे 2016 मधील कन्यागत महापर्वकाळ निधी च्या माध्यमातून सुमारे पावणे सात कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या बहुमजली वाहन पार्किंग चे लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते फीत कापून दिमाखदारपणे पार पडले. या कार्यक्रमाला पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर व जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांची प्रमुख उपस्थिती होती.
2016 मध्ये कन्यागत महापर्वकाळ महोत्सव अंतर्गत विकास निधीतून परिसर विकासासाठी सुमारे एकशे 121 कोटी निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यातील सुमारे पावणे सात कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या बहुमजली वाहन पार्किंगचे लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला.
कोल्हापूर जिल्ह्यातील हे पहिले बहुमजली पार्किंग असून यामुळे सुमारे तीनशे चार चाकी वाहनांची वाहन पार्किंगची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पहिल्यांदाच उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने दत्त दर्शनासाठी आले होते. यावेळी दत्त मंदिरात दत्त देवस्थान चे विश्वस्त संतोष खोंबारे यांनी श्री चरणी प्रार्थना केली. यावेळी पहाटेपासून गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवरती पार्किंग परिसराची स्वच्छता व रंगरंगोटी करून त्यास देखणे स्वरूप देण्यात आले होते.
कार्यक्रमाला राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार राजीव आवळे, प्रांताधिकारी विकास खरात, समीर शिंगटे, उद्योजक मदन कारंडे, युवा नेते आदित्य यड्रावकर, दत्त देवस्थान चे माजी अध्यक्ष अमोल विभूते, सरपंच पार्वती कुंभार उपसरपंच रमेश मोरे, दत्त देवस्थान चे अध्यक्ष सदाशिव जेरे पुजारी सचिव संजय पुजारी, ग्रामसेवक बी.एन टोणे सर्व ग्रामपंचायत सदस्य व देवस्थान विश्वस्त उपस्थित होते.