मित्रांनो, ‘दे धक्का’ चित्रपट आपल्या सगळयांनी बघितला आहे. त्यात आपल्या मक्या म्हणजे मकरंदनं गाडीतलं पेट्रोल वाचविण्यासाठी एका पार्टचा शोध लावल्याची स्टोरी प्रत्येकालाच माहित आहे. अशीच शक्कल लढवत पंजाबच्या एका व्यक्तीने जुन्या सायकलीला चक्क इलेक्ट्राrक सायकलमध्ये बदलले आहे.
सर्वांना आठवत असेल, की रेंजर सायकल येण्याआधी सर्वांकडे एकच सायकल असायची. मजबूत लोखंडी आणि अगदी निवांत फिरण्यापासून, वैरणिचा बिंडा आणण्या पर्यंतची सर्व कामे या सायकलवरुण करायची. लहाणपणी बाबांसोबत सायकलच्या पुढच्या नाfळवर बसूण गावातून मारलेली फेरी कोण विसरणार. आता बदलत्या लाईफ स्टाईलमध्ये प्रत्येक व्यक्ती क्रियेटीव्ह बनत आहे.
पंजाबच्या गुरसौरभ सिंग यांनी सायकलसाठी असंच एक उपकरण बनविले आहे, त्यामुळे ते सध्या चचे&त आले आहेत. ज्यामूळे आपली जुनी सायकल पॉवर फुल सायकलमध्ये बदलते. शिवाय सायकलचा वेग आणि शक्ती देखील मोठया प्रमाणात वाढते. मग वैरणचा बिंडा काय चिज आहे.
उपकरणाचे वैशिष्टय़े –
- या उपकरणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या सायकलमध्ये कोणतेहि बदल करण्याची आवश्यकता नाहि. म्हणजे सायकलमध्ये काfटंग किंवा वेल्डिंग पण करायची नसते. फक्त सायकलच्या पॅडलवर हे त्रिकोणासारखं दिसणारे उपकरण नट बोल्टने घट्ट आवळायचे, आणि झाली आपली इलेक्टि^क सायकल तयार.
- हि सायकल तब्बल 170 किलो पर्यंतचे वजन पेलू शकते. म्हणजे दोस्तासोबत डबलशीट जाण्याची मजा घेता येणार यात काय वाद नाहि.
- एकदा चार्ज केल्यावर हि सायकल 40 किमी पर्यंत जाते. तर एका तासात 25 किमी. चा प्रवास आपल्याला करता येतो.
- राहिला प्रश्न सायकल शेतात चालते का ? शेतातील रस्त्यावर िकंवा चिखलातहि हि सायकल आरामात चालते. त्यामुळे पावसाळयात शेताला जाण्याची चिंताच मिटली.
- अलुमिनियम पासून बनविलेले हे उपकरण फायर आणि वॉटरप्रूफ आहे. याच प्रात्यक्षिकहि गुरसौरभने करुण दाखविले आहे.
- याशिवाय मोबाईल फोन चार्ज करण्यासाठी यात युएसबी पोर्टची सुविधा देण्यात आली आहे.
- आता तुम्ही म्हणत असाल. वाटतंच चार्जिंग संपले तर मग काय करायचे. यालाहि सोल्यूशन आहे. या सायकलचे खास वैशिष्ट्य म्हणजे चार्जिंग संपल्यानंतर 20 मिनिटांच्या पेडलिंगनंतर या सायकलची बॅटरी 50% चार्ज होते.
आनंद महिंद्रा यांनी केले कौतुक –
आता एवढी भारी सायकल बनविल्या म्हणजे चर्चा तर होणारच. हि माहिती उदयोजक महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनाहि मिळाली. त्यांनी गुरसौरभचे हे उपकरण प्रचंड आवडले आहे. त्यांनी ट्विटर वरून माहिती शेअर केली. आता गुरसौरभच्या कंपनीत त्यांनी गुंतवणूक करायला रस दाखविला आहे.