टिळकवाडी पोलिसांची परिसरात जागृती
प्रतिनिधी / बेळगाव
वाढत्या चोऱया, घरफोडय़ांमुळे नागरिकांबरोबरच पोलीस दलाचीही चिंता वाढली आहे. त्यामुळे टिळकवाडी पोलिसांनी जागृती मोहीम हाती घेतली असून गुरुवारी दिवसभर अनेक ठिकाणी नागरिकांच्या बैठका घेऊन त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबरोबरच आपल्या परिसरात फिरणाऱया संशयित व्यक्तींबद्दल माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार, उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी आदी अधिकाऱयांनी शांतीनगर, शिवाजी कॉलनी, गजानन महाराज कॉलनी परिसरात वेगवेगळय़ा वसाहतींना भेटी देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आहे. चोऱया व घरफोडय़ा टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
आपल्या परिसरात फिरणाऱया अनोळखी व संशयास्पद व्यक्तींवर नजर ठेवावी, अशा व्यक्तींच्या वावराबद्दल 112 क्रमांकाशी संपर्क साधून माहिती द्यावी. परगावी जाताना शेजाऱयांना आणि जवळच्या पोलिसांना त्याची कल्पना द्यावी. दरवाजाला कुलूप न लावता इंटरलॉक बसवावे. सध्या कमी खर्चात अलार्म व्यवस्था उपलब्ध आहे. ही व्यवस्था आपल्या दरवाजाला लावल्यास चोरटय़ांनी कुलूप फोडल्याबरोबर अलार्म वाजतो. ज्यांना शक्मय आहे त्यांनी तो बसवावा.
सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, असे आवाहनही पोलीस अधिकाऱयांनी नागरिकांना केले आहे. महिला व ज्ये÷ नागरिकांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले असून मौल्यवान वस्तू, दागिने सुरक्षिततेचा विचार करून लॉकरमध्ये ठेवावेत, असा सल्लाही पोलिसांनी दिला आहे. गजानन महाराज कॉलनी परिसरात दोन घरे फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. शिवाजी कॉलनी परिसरात एक घरफोडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे.