ऑनलाईन टीम/तरुण भारत
काही शत्रू देश हनी ट्रॅपचा वापर करून इतर देशाच्या सैनिकांना लक्ष्य करत आहेत. यामध्ये भारतीय जवानांचा देखील समावेश आहे. दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्राँचने (Delhi Police Crime Brance) हेरगिरीच्या (Spying) आरोपाखाली भारतीय वायू दलाच्या एका जवानाला अटक (IAF soldier arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या जवानाचे नाव देवेंद्र असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयया याच्या पाठीमागे हात असल्याचा संशय दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्राँचने वर्तवला आहे.(IAF soldier trapped in honey trap)
दरम्यान, काही शत्रू देश हनी ट्रॅपचा वापर करून इतर देशाच्या सैनिकांना लक्ष्य करत आहेत. या माध्यमातून ते सुरक्षा यंत्रणेशी संबंधित माहिती काढण्यात ते यशस्वी होतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने भारतीय हवाई दलाच्या एका जवानाला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
हवाई दलाच्या जवानाला हनी ट्रॅपमध्ये अडकवत त्याच्याकडून संवेदनशील माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तपासात संबंधित जवानाच्या पत्नीच्या बँक खात्यात काही संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळून आल्याचंही समोर आलं आहे.









