आगार प्रमुखांकडून दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप, एसटी प्रशासनात खळबळ, पोलिसात गुन्हा
मिरज / प्रतिनिधी
एसटी आंदोलानंतर कामावर हजर होऊनही आगार प्रमुखांकडून केवळ मर्जीतील कर्मचाऱ्यांना कामे दिली जात असल्याचा आरोप करुन एसटी चालक मेहबूब मौला आंबेकरी (रा. मिरज) यांनी अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
बुधवारी सकाळी हा प्रकार घडला. यामुळे एसटी प्रशासनात खळबळ उडाली होती. दरम्यान, आगार प्रमुख शिवाजी खांडेकर यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात तक्रार दिली असून, आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या मेहबुब आंबेकरी या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारामुळे एसटी कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमधील संघर्ष चव्हाटय़ावर आला आहे.