ऑनलाईन टीम/तरुण भारत
अकोल्यातील जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावामध्ये परस्पर बदल करून पालकमंत्री बच्चू कडू यांनी एक कोटी ९५ लाखांचा निधीचा अपहार केल्याचा ठपका वंचित बहुजन आघाडीने केला होता. वंचित आघाडीने राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याबाबत एका प्रकरणावर न्यायालयात दाद मागितली हाेती. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानूसार कडू यांच्यावर सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात (city kotwali police station) गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. या गुन्ह्यात अटकपुर्व जामीन (bacchu kadu pre arrest bail application) मिळावा यासाठी मंत्री कडू यांनी सत्र न्यायालयात (court) धाव घेतली हाेती. यावर आज सुनावणी झाली असताना जिळ सत्र न्यायालयाने अकोला (akola) जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री बच्चू कडू (bacchu kadu) यांचा आज (बुधवार) अटकपुर्व जामीन (bail) अर्ज मंजूर केला आहे.
पालकमंत्री बच्चू कडू यांनी अकोल्यातील जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावामध्ये परस्पर बदल करून एक कोटी ९५ लाखांचा निधीचा अपहार केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता. दरम्यानच्या काळात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्हा नियोजन समितीच्या १३ कामांना स्थगिती दिली. त्यानंतर पालकमंत्री कडू यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी वंचितने करुन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवेधन पुंडकर यांनी न्यायालयात धाव घेतली हाेती. न्यायालयाने कलम १५६ (३) नुसार पालकमंत्री बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात पालकमंत्री कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.
आज सत्र न्यायालयामध्ये सुनावणी झाली. यामध्ये दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पालकमंत्री कडू यांना नऊ मे पर्यंत तात्पूरता जामीन मंजूर केला. त्यावेळी न्यायालयाने पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कडू यांना आजच्या दिवशी हजर राहण्याचे आदेश दिले होते.