ऑनलाईन टीम/तरुण भारत
पीडीएफ प्रमुख आणि जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti Former Chief minister of J&K) यांनी दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये (jahangirpuri violence) झालेली हिंसा व अल्पसंख्याक समाजावर करण्यात आलेली बुलडोझर कारवाईवरून सरकारवर टीका केली. तसेच देशद्रोहाच्या कायद्याबाबत ही मुफ्ती यांनी प्रतिक्रिया देत भाजपावर टीका केली आहे. मुफ्ती यांनी म्हटले की, देशात अल्पसंख्यांकांवर हल्ले होत आहेत, हे खूप दुदैवी आहे. त्यांच्या घरावर बुलडोझर चालवले जात आहेत. अशा घटना रोखण्यासाठी न्यायसंस्थेने स्वत: पुढे आले पाहिजे, मात्र तसे होताना दिसत नाही.
तसेच आज देशद्रोहाच्या गन्ह्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) दिलेला निकाल आणि दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये प्रशासनाने केलेली बुलडोझर कारवाईवरून मुफ्ती यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मुफ्ती यांनी म्हटले की, जर आमचा देश विद्यार्थी, कार्यकर्ते व पत्रकारांवर देशद्रोहाचा आरोप लावत राहिला तर आमची स्थिती श्रीलंकेहूनही वाईट होईल. आशा आहे की, भाजप श्रीलंकेतील स्थितीतवरून काहीतरी धडा घेईल आणि धार्मिक हिंसा व बहुसंख्याकवादाला रोखेल.
देशद्रोहाच्या कायद्याबाबत महबूबा यांची प्रतिक्रिया
आज देशद्रोहाच्या गन्ह्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरही मुफ्ती यांनी भाष्य केलं. महबूबा मुफ्ती यांनी म्हटले की, जर आमचा देश विद्यार्थी, कार्यकर्ते व पत्रकारांवर देशद्रोहाचे आरोप लावून त्यांना तुरुंगात डांबत असेल तर, आमची स्थिती श्रीलंकेहूनही वाईट होईल. आशा आहे की, श्रीलंकेत निर्माण झालेल्या परस्थितीवरून केंद्रतील भाजप सरकार काहीतरी धडा घेईल व जातीय हिंसा तसेच अल्पसंख्याक समाजावर होत असलेला अन्याय, अत्याचार रोखण्याचा प्रयत्न करेल.