शिवसंपर्क अभियानाचेही नियोजन होणार
वेंगुर्ले /वार्ताहर-
वेंगुर्ले तालुका शिवसेना पक्षाची दि. 12 मे 2022 रोजी होणारी मासिक बैठक दि. 14 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजता साईमंगल कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा शिवसेना प्रमुख संजय पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या बैठकीत शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दि. 26 ते 29 मे कालावधीत राबविण्यात येणाऱ्या शिवसंपर्क अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्यांच्या दौऱ्यात या अभियानाची यशस्विता साधण्यासाठी त्याचे नियोजन करणे. तसेच आगामी काळात होणाऱ्या जि.प., पं.स. व नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुथ निहाय आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे. वेंगुर्ले तालुक्यातील शिवसेनेच्या सर्व फ्रंटच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या सभेला वेळीच उपस्थित रहावे. असे आवाहन वेंगुर्ले तालुका शिवसेना प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी केले आहे.









