वृत्तसंस्था/ मुंबई
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधीत्व करणारा विंडीजचा फलंदाज हेतमेयरने गयानाला प्रयाण केले आहे. येत्या काही दिवसांमध्ये त्याची पत्नी पहिल्या अपत्याला जन्म देणार असल्याने हेतमेयर तातडीने गयानाला रवाना झाला.
आयपीएल स्पर्धेतील उर्वरित सामन्यांसाठी हेतमेयर लवकरच पुन्हा मुंबईत दाखल होईल, असे राजस्थान रॉयल्स संघाच्या व्यवस्थापकाने सांगितले. या स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने आपल्या शेवटच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा पराभव केला आहे. आता राजस्थान संघाचा या स्पर्धेतील पुढील सामना दिल्ली कॅपिटल्स बरोबर होणार आहे.









