मुंबई- खासदार नवनीत राणा यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आमदार आशिष शेलार यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली.भेटीनंतर फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. खासदार नवनीत राणा यांची सध्या तब्येत ठीक असली तरी, राज्य सरकारने त्यांना योग्य वागणूक दिली नाही. हि बाब अतिशय गंभीर आहे. त्यांच्या या वागण्यावरून महाविकास आघाडीने कौर्याच्या सर्व सीमा गाठल्या आहेत. असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला,
न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर खासदार नवनीत राणा भायखळा येथील तुरूंगात होत्या. जामीन मिळाल्यानंतर ५ मे रोजी त्यांची जामीनावर मुक्तता करण्यात आली. मात्र, प्रकृती बरी नसल्यानं त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर भाजपा नेत्यांनी नवनीत राणा यांची भेट घेतली आहे.दरम्यान आज नवनीत राणा यांना आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.








