प्रतिनिधी/ बेळगाव
नैर्त्रुत्य रेल्वेने परीक्षांसाठी विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दि. 9 व 10 रोजी एनटीपीसीच्या विविध परीक्षा होणार असल्याने हुबळी-औरंगाबाद व बेळगाव-मंगळूर अशा रेल्वे सोडण्यात येणार आहेत.
07386 ही औरंगाबाद-हुबळी परीक्षा एक्स्प्रेस सोमवार दि. 9 रोजी औरंगाबाद येथून सुटणार असून 10 रोजी सकाळी 7 वा. हुबळीला पोहोचणार आहे. जालना स्टेशन, परळी वैजनाथ, लातूर, उस्मानाबाद, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, मिरज, घटप्रभा, बेळगाव, लोंढा, धारवाड येथे ती थांबणार आहे. 06042 बेळगाव-मंगळूर परीक्षा एक्स्प्रेस सोमवार दि. 9 रोजी रात्री 10 वा. बेळगाव येथून निघणार असून दि. 10 रोजी मंगळूर येथे पोहोचणार आहे.









