टाळ, मृदंग, दिमडी, हालगी, हार्मोनियम, तुनतुने आदी वाद्यांचे सादरीकरण : महा-ताल वाद्यमहोत्सवाची सांगता
प्रतिनिधी/कोल्हापूर
प्रसिध्द ढोलकीवादक विजय चव्हाण यांच्या ढोलकी वादनाने महा-ताल महोत्सवाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला सुरूवात झाली. ‘फोक ड्रम आŸफ महाराष्ट्र’ या सांगितिक कार्यक्रमात संबळ, चंडक, हार्मोनियमन, हालकी, तुनतुने आदी महाराष्ट्रातील वाद्यांच्या सुरांनी रसिक प्रेक्षकांना मोहिनी घातली. खासबाग मैदानात महाराष्ट्रीयन वाद्याचे ताल, लय आणि सूर घुमले. तसेच तौफिक कुरेशी यांचा झेंबा वादनातील तालबध्द ठेका.. जलतरंगाची केलेली कोमल साथसंगत, तबल्याची बहुविध ताल आणि केलेली ढोलकी साथीला प्रेक्षकांनी टाळय़ा व शिट्टय़ांनी दाद दिली.
ढोलकी आणि कड यांचा संयुक्त वापर असलेल्या गाण्याची धून वाजवली. चोंडक या वाद्याचा वापर करीत ‘लल्लाटी भंडार…’ या गाण्यातून भक्तीमय वातावरण निर्मिती केली. ढोलकी, दिमडी, टाळ यांच्या तालात सादर झालेल्या अनेक गाण्यांची धून वाजवताच प्रेक्षक गुणगुणले. ढोलकी आणि तबल्याच्या बाजाने केलेल्या ढोलकी वादनाच्या सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. पारंपारिक भजन, किर्तनगची धून वाद्यातून सादर करीत पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शनच प्रेक्षकांना घडवले. हालगी ढोलकीच्या ठेक्यावर प्रेक्षकांनी अक्षरश: बसल्या जागेवर ठेका धरला होता. ढोलकीवादनात मराठी चित्रपटातील अनेक लावण्या आणि गाण्यांचे सादरीकरण महाराष्ट्रीयन वाद्यांची धून वाजवत केले. टाळ, मृदंग, संबळ, ढोलकी, हालगीच्या तालाचा अनुभव प्रेक्षकांनी घेतला. हालगी कडकडाटाने अवघ असमंत भरून गेला होता. हलगीच्या कडकडाटाने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. सलवार कुर्ता आणि फेटा अशी वेशभुषा कलाकारांनी केली होती. जसराज जोशी यांच्या ‘भा†दका’च्या कलाविष्काराने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे झिंबा वादक उस्ताद ता†फक कुरेश यांचे मंचावर आगमन झाले आणि त्यांनी झिंबावर थाप टाकताच उमटलेल्या ध्वनीलहरींनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. श्वासातील ताल कसा असतो याचे प्रात्यक्षिक सुरूवातीलाच सादर करून उपस्थितांची मने जिंकली. जलतरंग आवर उमटलेल्या ध्वनीलहरी तसेच तबल्याचा ताल, ठेका व झिंबा यांची अनोखी जुगलबंदी जवळपास एक ते दीड तास रंगली होती. तबल्यावर झपताल, पंजाबी, कायदा, रेला याची नजाकत अनुभवताना रसिकांनी टाळय़ांच्या गजरात साथ दिली. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वादकांनी केलेले वादन रसिकांसाठी एक अनोखी पर्वणीच होती. यामध्ये त्यांनी विशेष पैजु वाद्य आणि पाण्यात बाऊल ठेवून जलतरंग वाद्याचे सादरीकरण करीत प्रेक्षकांना भुरळ घातली.
आदिवासी लोकवाद्यांने रसिक मंत्रमुग्ध
आदीवासी पाढय़ातील पारंपारिक लोकवाद्य वाजवत कलाकारांनी लोकनृत्य केले. पायावर ढोलकी ठेवून वाजवत सादर केलेल्या लोकगीताचे सर्व प्रेक्षकांनी कौतुक केले. प्रेक्षकांनी वाद्ये व त्यांची माहिती महत्व जाणून घेतले. आदिवासी भागातील थळीमध्ये काटी घुसवून वाद्य वाजवत लोकगीत गाणाऱया कलाकाराने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली. तारपा, घांगळी, घुमळ, कासाळे, पुंगी, सनई, तुणतुणे, घुंगरु, एकतारी, ा†पपाणी, मटके, मुरसिंग, उमरु, दुदुंभी, खां†जर, शिंग, तुतारी, कर्णा, सारिंदा, पेना, नंदुणी, मुरसिंगार, ा†वा†चमा†वणा, थाळी, तडफा, पेपुडी अशा लोकवाद्यांचा सूर संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृहात घुमला. महा-ताल वाद्य महोत्सवाची सांगता असल्याने प्रेक्षकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती.









