सांगली- सांगली जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी विष्णू मारुतीराव कांबळे आणि अधीक्षक विजयकुमार अशोक सोनवणे या दोघांना १ लाख ७० हजार रुपयांची लाच स्विकाराताना रंगेहात पकडण्यात आले आहे. ही कारवाई सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. या दोघांनी पदवीधर वेतनश्रेणी मान्यता मिळवून देण्यासाठी ही लाच स्विकारली आहे. त्यांच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार आणि त्याचा सहकारी शिक्षक या तिघांकडून पदवीधर वेतनश्रेणी मान्यता मिळवून देण्यासाठी प्रत्येकी ६० हजार प्रमाणे एक लाख ८० हजार रूपये लाचेची गागणी केली होती. अखेरीस एक लाख ७० हजार रूपयांवर हा व्यवहार ठरला होता. त्यानंतर या तक्रारदारांनी याची माहिती लाचलुचपत विभागाला दिली. त्यानंतर लाचलुचपत विभागाने याची शहानिशा केली असता ही तक्रार योग्य असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी शुक्रवारी सांयकाळी अधीक्षक सोनवणे यांनी एक लाख ७० हजार रूपये लाच स्विकारली. यानंतर तात्काळ लाचलुचपत विभागाने या दोघांना अटक केली. त्याच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.