कोल्हापूर/विनोद सावंत
शाहू मिल येथील २७ एकर जागेत राजर्षी शाहू महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारले जाणार आहे. महापालिकेकडून स्मारकाचा आराखडा तयार करण्यात आला असून सुमारे ४०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. शाहू मिल येथे मनपा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आराखडय़ाचे सादरीकरण केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही दिली आहे.
लोकराजा राजषीं शाहू महाराज आयुष्यभर रयतेच्या हितासाठी झटले. राधानगरी धरण, सर्व समाजासाठी बोर्डिंग उभारली. अशा लोकराजाचे कार्य नव्या पिढी समोर येणे आवश्यक आहे. त्यांच्या कार्याचा जागर व्हावा. या उद्देशाने शाहू मिल येथे त्यांचे अंतरराष्ट्रीय दर्जाचे शाहू स्मारक उभारण्याची मागणी जोर धरू लागली. राज्यात आघाडी सरकार सत्तेवर असताना २०१४ मध्ये शाहू मिल येथे शाहू स्मारक उभारण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला होता. परंतू काही कारणात्सव आराखडय़ाला मंजूरी मिळाली नाही. आता राजषी शाहू महाराज यांची स्मृती शताब्दी वर्षानिमित्त शाहू स्मारकाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनीही स्मारक उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
शाहू स्मारकाचा आराखडा करण्यासाठी समिती नेमली गेली. समितीने राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा घेतली. पाच लाखाचे बक्षिसही ठेवण्यात आले होते. ११ आर्किटेक्ट आराखडा सदार केले होते. त्यापैकी पुण्यातील शारंग जोशी आणि श्रीकांत अनवट यांच्या आराखडा निश्चित केला. या आरखडय़ाचे शुक्रवारी शाहू मिल येथील कृतज्ञाता पर्व सभेत सादरीकरण करण्यात आले. शाहू महाराज यांचा ठसा दिसले असा आराखडा तयार करण्यात आला आहे. शाहू स्मारकासाठी २७ एकर जागा महापालिकेकडे विनामुल्य हस्तांतरी होणे आवश्यक आहे. तसेच शासनाकडून प्रकल्पासाठी निधी मिळणे आवश्यक आहे.
शाहू स्मारक आराखड्याचे मुख्यमंत्र्यासमोर होणार सादरीकरण
१५ दिवसांत आराखडय़ाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमत्री अजित पवार यांच्या समोर सादरीकरण केले जाणार आहे. जुनमध्ये बजेटमध्ये जास्तीचा निधीची तरतूद केली जाईल. निधी देण्यात महाविकास आघाडी कमी पडणार नसल्याचे ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे.
असे असणार स्मारक
- तीन प्रवेशद्वार
- एज्युकेशनल हब
- राजर्षी शाहू महाराज यांचा ५१ फूटी पुर्णकृती पुतळा
- १२०० क्षमतेच खुले नाटय़गृह
- मध्यवर्ती इमारत, कालादालन
-विद्यमान गिरणी संरचनेचे संवर्धन आणि कला आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून त्याचा पुनर्वापर करून संगीत आणि नाटक सुविधा, ग्रंथालय, फिल्म आर्काइव्हची सुविधा देणे
-काटीतीर्थ तलाव विकसीत करून मुलांच्या खेळाचे क्षेत्र, लाइट आणि साउंड शो, फाउंटन शो, पादचारी मार्ग, खाऊ गल्ली उभारणे. - सार्वजनिक वाहतूक सुविधेला प्रोत्साहन देण्यासाठी सुनियोजित ट्रान्झिट हब.
- १२०० क्षमतेचे सुसज्ज सभागृह
- ७१०० क्षमतेचे दृकश्राव्य थिएटर
-५०० कार आणि २५०० दुचाकी क्षमतेचे भूमिगत पार्किंग - ’छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनातील संस्मरणीय क्षणांवर भर देणारी थीम आधारित लँडस्केप डिझाइन. २७ एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक
- महापालिका शाहू मिलचे पुनरूज्जीवनाची आवश्यकता
शाहू मिल’ ही दूरदृष्टी असलेल्या राजर्षी शाहू महाराज यांचे एक उत्तम उदाहरण आहे. कोल्हापुरातील औद्योगिक क्रांतीला चालना देण्यासाठी आणि नागरिकांना रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून १९०६ मध्ये याची स्थापन करण्यात आली. या मिलने स्थापनेपासूनच शहराचा कायापालट पाहिला आणि सध्या गिरणीची रचना आणि कॅम्पस जीर्ण अवस्थेत आहेत. त्याच्या पुनरुज्जीवनाची नितांत आवश्यकता आहे.
शाहू मिलची मूळ ओळख जपून हेरिटेज स्ट्रकचर कायम ठेवून शाहू स्मारकाचा आराखडा केला आहे. २७ एकर जागेत अंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचे नियोजन असून तीन टप्प्यात आराखडा करण्यात आला आहे. सुमारे ४०० कोटींचा हा आराखडा आहे.
नेत्रदिप सरनोबत, शहर अभियंता