बेळगाव : कोल्हापूरचे स्फूर्तिस्थान, थोर समाजसेवक छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त अजित महादेव औरवाडकर यांनी आकर्षक रांगोळी रेखाटली आहे.
सदर रांगोळी वडगाव येथील ज्योती फोटो स्टुडिओ येथे काढण्यात आली आहे. ती पाहण्यासाठी सर्वांना खुली असून शुक्रवार दि. 6 रोजी सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत पाहता येणार आहे.









