ओह त्या अधिकाऱयांना अतीरीक्त काम
प्रतिनिधी /पणजी
पोलीस खात्यात अधीक्षकांची संख्या कमी झाली असल्याने जे अधीक्षक कार्यरत आहेत त्यांच्यावर कामाचा ताण पडलेला आहे. प्रत्येक अधिक्षकांकडे किमान सहा ते सात पदाचा ताबा असल्याने त्यांची मोठी तारंबळ उडत आहे. गेल्या महिन्यात आणखिन दोन अधीक्षक सेवा निवृत्त झाल्याने आता आणखिन दोन जागा रिकाम्या झाल्या आहेत. उपअधीक्षकांना बडती देऊन रिमाका असलेल्या अधीक्षकांच्या जाग त्वरी भराव्या असे पोलीस खात्याने सरकारला कळविले आहे. याबाबत सर्व सोपस्करही पूर्ण करण्यात आले अशी माहिती वरीष्ठ पोलीस अधिकाऱयांनी दिली आहे.
पोलीस खात्यात उपअधीक्षक पदावरू अधीक्षक पदावर बडती मिळण्यासाठी किमान सहा वर्षे कायमस्वरूपी उपअधीक्षक पदावर सेवा बाजाविणे जरुरीचे असते. सध्यास्थितीत 9 अपअधीक्षक हे बडतीसाठी पात्र असले तरी त्यांनी 4 वर्षे 3 महिने उपअधीक्षक पदावर कायमस्वरूपी सेवा बजावलेली आहे. त्यामुळे हे 9 उपअधीक्षक अधीक्षक पदासाठी पात्र असतानाही त्यांना बडती दिली जात नाही. दुसऱया बाजून पोलीस खात्यातील अधीक्षक सेवा निवृत्त होत असल्यामुळे जे सेवेत आहेत त्यांच्याव अधिक कामाचा ताण वाढत आहे. जे उपअधीक्षक अधीक्षक पदासाठी पात्र आहेत त्यांना सरकारने कार्यकाळात काही प्रमाणात सवलत द्यावी अशी विनंतीही पोलीस खात्याने सरकारकडे केली होती. मात्र अद्याप काहीही झालेले नसल्याचे दिसून येत आहे.
पोलीस खात्यात एकूण 17 पोलीस अधीक्षकांची गरज आहे. त्यात 13 जीपीएस तर 4 आयपीएस पोलीस अधिकारी दिले जातात. सध्यास्थिती पोलीस खात्याकडे केवळ 8 पोलीस अधीक्षक आहेत. त्यात 5 गोवा पोलीस तर 3 आयपीएस एकूणच जे पोलीस अधीक्षक कार्यरत आहेत ते पोलीस खात्याचा सर्व भार संभाळत आहे. उपअधीक्ष ते अधीक्ष बडती प्रकरण गेल्या कित्येक वर्षापासून सरकारकडे पडून राहिलेले आहे सरकारने बडती प्रकरणाला प्रधान्य देऊन पोलीस खात्यातील अधीक्षकांची उणीव कमी करावी असे एका वरीष्ठ पोलीस अधिकाऱयांनी सांगितले.








