वार्ताहर /खानापूर
सोमवारपासून शिवजयंतीसह बसव जयंती व रमजान ईद सण साजरे होणार आहेत. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने पथसंचलन करून सण शांततेत साजरे करावेत, असे आवाहन केले आहे.
रविवारी खानापूरचा बाजारचा दिवस होता. या अनुषंगाने खानापूर पोलीस ठाणे पोलिसांनी शहरातून पथसंचलन केले. पोलीस स्थानकपासून सुरू झालेले हे पथसंचलन शिवस्मारकापासून स्टेशन रोड, देसाई गल्ली, चिरमुरकर गल्लीसह बाजारपेठ, चौराशी देवी मंदिरापासून जांबोटी सर्कल भागातून करण्यात आले. या पथसंचलनात बैलहोंगल विभागाचे उपअधीक्षक शिवानंद कठगी, खानापूरचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे, उपनिरीक्षक शरणेश जालीहाळ यांनी सहभाग घेतला होता.









