ऑनलाईन टीम तरुण भारत
चारधाम यात्रेला येत्या ३ मेपासून सुरू होत आहे. उत्तराखंड सरकारने या यात्रेसाठी संपूर्ण तयारी केली आहे. राज्य सरकारने (State Government) चार धामला जाणाऱ्या भाविकांची दैनंदिन मर्यादा निश्चित केली आहे. बद्रीनाथमध्ये दररोज १५ हजार केदारनाथमध्ये १२ हजार गंगोत्रीमध्ये ७ हजार आणि यमुनोत्रीमध्ये ४ हजार यात्रेकरूंना परवानगी देण्यात आली आहे. 45 दिवसांसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनामुळे दोन वर्षे झाले चारधाम यात्रा झालेली नाही. दोन वर्षांनंतर चारधाम यात्रेला परवानगी मिळाल्याने यंत्रकरूंमध्ये प्रचंड उत्साह आहे. यावेळी केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री धाममध्ये मोठ्या संख्येने लोक पोहोचण्याची अपेक्षा आहे. (Uttarakhand Chardham Yatra will start from 3rd May; The number of devotees is fixed)
चारधाम यात्रा २०२२ चे दरवाजे उघडण्यासाठी सज्ज झाले आहेत. ३ मे रोजी गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडून चारधाम यात्रा सुरू होईल. धामांसाठी देव डोल्यांचा प्रस्थान कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. माहिती देताना बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे मीडिया प्रभारी डॉ. हरीश गौर यांनी सांगितले की, केदारनाथ धामचे दरवाजे शुक्रवार, ६ मे रोजी सकाळी ६.१५ वाजता उघडतील. भगवान केदारनाथच्या पंचमुखी डोलीच्या प्रस्थान कार्यक्रमांतर्गत भैरव पूजनाची तारीख १ मे, रविवार आहे. सोमवार, २ मे रोजी सकाळी २ वाजता भगवान केदारनाथचे पंचमुखी डोली धाम येथे प्रस्थान होणार आहे. २ मे, पहिला मुक्काम श्री विश्वनाथ मंदिर, गुप्तकाशी येथे मुक्काम असणार आहे. मंगळवार,३ मे रोजी सकाळी ८ वाजता गुप्तकाशी येथून फाट्याकडे प्रस्थान व मुक्काम होणार आहे.
६ मी रोजी केदारनाथ धामचे दरवाजे उघडणार
६ मी रोजी केदारनाथ धामचे दरवाजे उघडणार आहेत. दरम्यान, गौरमाई मंदिर गौरीकुंड प्रस्थान व मुक्काम ४ मे बुधवारी सकाळी ८ वाजता फाटा येथून होईल. गुरुवार, ५ मे रोजी गौरीकुंड येथून सकाळी ६ वाजता भगवानांच्या पंचमुखी डोलीचे गौरीकुंड येथून श्री केदारनाथ धामकडे प्रस्थान होईल. त्यानंतर शुक्रवार, ६ मे रोजी सकाळी ६.१५ वाजता भाविकांसाठी केदारनाथ धामचे दरवाजे उघडतील.