वृत्तसंस्था/ लंडन
प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया लिव्हरपूल फुटबॉल क्लबचे विद्यमान व्यवस्थापक जुर्गेन क्लॉप यांच्या व्यवस्थापक पदाच्या करारामध्ये दोन वर्षांची वाढ करण्यात आली आहे. लिव्हरपूल वरि÷ अधिकाऱयांनी क्लॉप यांच्याबरोबर हा नवा करार केला असून ते 2026 अखेर लिवरपूलचे व्यवस्थापक म्हणून राहतील.
या क्लबचे साहाय्यक व्यवस्थापक पेप लिंडर्स आणि पीटर क्रॅवीट्झ यांच्या करारामध्येही मुदतवाढ देण्याचा निर्णय लिव्हरपूल क्लबच्या वरि÷ अधिकाऱयांनी घेतला आहे. जुर्गेन क्लॉप हे 2015 च्या ऑक्टोबरमध्ये लिव्हरपूल संघात दाखल झाले होते. क्लॉप यांचा या क्लबबरोबर 2022 पर्यंत व्यवस्थापक म्हणून करार झाला होता. त्यांची कराराची मुदत संपुष्टात येण्यापूर्वीच त्यांना पुन्हा दोन वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत लिव्हरपूलने व्हिलारेलचा पहिल्या टप्प्यातील उपांत्य सामन्यात 2-0 असा पराभव करत तिसऱयांदा अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल केली आहे.









