काबूल / वृत्तसंस्था
अफगाणिस्तानातील मजार-ए-शरीफ परिसर शुक्रवारी दुहेरी स्फोटाने हादरला. बल्ख प्रांतातील मजार-ए-शरीफ येथे मशीद परिसरात झालेल्या दोन स्फोटांमध्ये किमान 9 लोक ठार आणि 13 जखमी झाले आहेत. या स्फोटांची जबाबदारी इस्लामिक स्टेट (आयएस) या संघटनेने स्विकारली आहे. दोन स्फोटांपैकी पहिला स्फोट मशिदीबाहेरील शाळेजवळ घडवण्यात आला. तर दुसरा स्फोट एका वाहनातच करण्यात आला. खोरासन प्रांतातील इस्लामिक स्टेटने हे स्फोट आपणच घडवल्याची कबुली दिली आहे. 2015 पासून अफगाणिस्तान आणि शेजारील पाकिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या या गटाने यापूर्वीही अनेक रक्तरंजित हल्ले केलेले आहेत.









