अक्कलकोट प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीला लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एकावर पोक्सोसह अट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की संशयित आरोपी बाळासाहेब कांतप्पा म्हाळू याने अल्पवयीन मुलीवर दि २८ एप्रिल रोजी मध्यरात्री पिडीताला मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. यावेळी पीडिताने घाबरून आरडाओरडा केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळ काढला. पिडीता ही अल्पवयीन व मागासवर्गीय असलेले माहीत असून सुद्धा आरोपीने अश्या प्रकारचे कृत्य केल्याने आरोपी विरुद्ध अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात बालकाचे लैंगिक अपराध संरक्षण कायदा ( पोक्सो ) व अट्रोसिटीच्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक केले. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिह गौर हे करीत आहेत.