विवाहितेचा छळ केल्याचा आरोप करत सासरच्या घराच्या समोरच विवाहितेवर अंत्यसंस्कार
प्रतिनिधी / मिरज
तालुक्यातील आरग लक्ष्मीवाडी येथील आरती अभिनंदन तळदंगे (वय 26 ) या विवाहितीने विहिरीमध्ये ऊडी घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना राञी उघडकीस आली. तिचे माहेर केंपवाड (ता.अथणी ) असून नातेवाईकांनी पैश्याची मागणीसाठी शारीरिक व मानसिक त्रास देऊन सासर कडील सासू , सासरा, नवरा, ननंद यानी करून आत्महत्त्येस प्रवृत केल्याची तक्रार मिरज ग्रामिण पोलीस ठाण्यात केली. पोलीसानी नवरा अभिनंदन व सासरा बाळू यांना राञी ताब्यात घेतले आहे. माहेर कडील नातेवाईकांनी नविन बांधकाम सुरू असणा-या घरा समोर च मयत आरती हिचा अंतिमसंस्कार केला
आरती व अभिनंदन यांचा विवाह 2012 मध्ये झाला होता .वारंवार आरतीच्या माहेरी पैसे आणण्याची मागणी केली जात होती. सदरची मागणी पुर्ण होत नाही म्हणून तिचा शारीरिक व मानसिक ञास सुरू होता . तिने आत्म हत्त्या केली नसून तिची हत्या करण्यात आली असल्याची तक्रार तिचा भाऊ सागर मुरगुंडे यांनी ग्रामिण पोलीस ठाण्यात केली आहे.