अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत दिली माहिती
यंदा होणाऱया 75 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलने स्वतःच्या ज्युरी मेंबर्सची घोषणा केली आहे. फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरी पॅनेलमध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदूकोनाचे नाव सामील आहे. तर फ्रान्समधील अभिनेता विंसेट लिंडनला ज्युरी पॅनेलचे अध्यक्षपद देण्यात आले आहे.

कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरी पॅनेलमध्ये सामील असण्याची माहिती दीपिकाने स्वतःच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक छायाचित्र शेअर करत दिली आहे. यात दीपिकासह अन्य 8 ज्युरी मेंबर्स दिसून येत आहेत. दीपिकाने ट्रिपल एक्स द रिटर्न ऑफ जेंडर केज या चित्रपटाद्वारे हॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तसेच तिने स्वतःच्या प्रॉडक्शन हाउस अंतर्गत ‘छपाक’ चित्रपटाची निर्मिती केली होती. 2018 मध्ये टाइम नियतकालिकाने दीपिकाला जगातील 100 सर्वात प्रभावशाली लोकांपैकी एक ठरविल्याचा उल्लेख कान्स फिल्म फेस्टिव्हलकडून करण्यात आला आहे.
असगर फरहादी, स्वीडिश अभिनेत्री नाओमी रैपेस आणि इटालियन अभिनेत्री-दिग्दर्शिका जस्मीन ट्रिंका देखील ज्युरी पॅनेलमध्ये सामील आहे. हा चित्रपट महोत्सव 17 मेपासून 28 मेपर्यंत चालणार आहे.
दीपिका शाहरुख खानसोबत ‘पठान’ चित्रपटात दिसून येणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनी प्रदर्शित होईल. तसेच ती ‘फाइटर’ आणि ‘द इंटर्न’ या चित्रपटांमध्ये देखील काम करतेय.









