भूल-भुलेया-2 चा ट्रेलर प्रदर्शित
अभिनेता कार्तिक आर्यनचा आगामी हॉरर कॉमेडी चित्रपट ‘भूल-भुलैया-2’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. हा चित्रपट 20 मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटात कार्तिकसह कियारा अडवाणी, तब्बू, राजपाल यादव आणि संजय मिश्रा हे कलाकार दिसून येणार आहेत.

चित्रपटाचे दिग्दर्शन अनीज बज्मी यांनी केले आहे. तर याची पटकथा फरहाद सामजी आणि आकाश कौशिक यांनी लिहिली आहे. भूषण कुमार आणि मुराद खैतानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
हा चित्रपट 2007 साली प्रदर्शित अक्षय कुमार, विद्या बालन, परेश रावल आणि राजपाल यादव यांच्या ‘भूल भुलैया’चा सीक्वेल आहे, त्या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले होते. भूल भुलैया-2 मध्ये कार्तिकने अक्षय कुमारची जागा घेतली आहे. तर ‘मंजुलिका’चे पुनरागमन होणार असून ही भूमिका कियारा अडवाणीने साकारली आहे.









