विक्रम भट्ट यांच्या चित्रपटात दिसून येणार
बॉलिवूडमध्ये टीव्हीवरील अनेक कलाकारांनी पदार्पण करत मोठे नाव देखील कमाविले आहे. आता बालिका वधू मालिकेत आनंदीची भूमिका साकारून प्रसिद्धी मिळविणारी अविका गौर देखील बॉलिवूड पदार्पण करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. महेश भट्ट यांची पटकथा असलेला आणि कृष्णा भट्ट यांच्याकडून दिग्दर्शित चित्रपटात ती काम करत आहे. भट्ट कुटुंबाने एका सोशल मीडिया पोस्टद्वारे अविकासोबतच्या चित्रपटाची माहिती दिली आहे.

विक्रम भट्ट यांनी इन्स्टाग्रामवर एक छायाचित्र शेअर केले असून यात महेश भट्ट, कृष्णा भट्ट आणि अविका गौर तसेच ते स्वतः दिसून येत आहेत. हा चित्रपटाचे चित्रिकरण पुढील वर्षापासून सुरू होणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘1920-हॉरर्स ऑफ द हार्ट’ असेल. या हॉरर चित्रपटात अविका मुख्य भूमिकेत दिसून येईल.
1920 या चित्रपटाने माझ्या जीवनात एक नवा अध्याय सुरु केला आहे. आता या सीरिजचा आणखीन एक चित्रपट तयार करत असून याच्या निर्मितीची धुरा मी पेलणार असल्याचे विक्रम भट्ट यांनी म्हटले आहे. अविका गौरच्या बॉलिवूड पदार्पणाची माहिती समोर येताच तिचे सहकलाकार तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.









