प्रतिनिधी /बेळगाव
चन्नम्मानगरच्या मुख्य रस्त्यावर देशपांडे बंगल्यासमोर एक निष्पर्ण वाळवी लागलेला वृक्ष कधीही कोसळेल अशा अवस्थेत उभा आहे. विशेष म्हणजे या मार्गावरून दिवस-रात्र सर्वप्रकारची वाहतूक सुरू असते. रस्त्याच्या दुसऱया बाजूला खांबावर उच्च दाबाची वीजवाहिनी लोंबकळत आहे. अशा परिस्थितीत हा वृक्ष कधी कोसळेल याचा नेम नाही.
त्यामुळे एखादी जीवितहानी होण्याची शक्मयता नाकारता येत नाही. संबंधित अधिकाऱयांनी याकडे लक्ष देऊन पुढील होणारा संभाव्य धोका टाळावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.









