सत्तरीतील अनेक गावांतील स्थिती : नद्यांवर बंधाऱयांची साखळी मात्र नियोजनाअभावी नामुष्की
प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी तालुक्मयातील सर्व नद्यांवर सुमारे 120 कोटी खर्चून बंधाऱयांची साखळीच उभारली आहे. सध्यातरी बंधाऱयातून प्रचंड प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे. तरीही अनेक गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
या बंधाऱयातील पाण्याचे रितसर नियोजन केल्यास सत्तरीत पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी निकालात येणार आहे. त्यासाठी योग्य व्यवस्थापनाची गरज असून त्या दृष्टिने पाणीपुरवठा अधिकाऱयांनी नियोजनबद्ध आराखडा राबविण्याची गरज सत्तरी तालुक्मयातील नागरिकांतून व्यक्त होत आहे.
यासंदर्भात माहिती अशी की सत्तरी तालुक्मयातील म्हादई, वाळवंटी, रगाडा, वेळूस अशा अनेक नद्यावर जवळपास एकशे वीस कोटी खर्चून बंधारे उभारण्यात आलेले आहेत. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ अंतर्गत हे बंधारे बांधल्या दहा वर्षांपासून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा साठा होताना दिसत आहे. यामुळे भूगर्भामधील पाण्याची पातळी हळुहळू वाढू लागली आहे.
सध्यासर्वच बंधाऱयातून लाखो लिटर पाण्याचा साठा आहे. मात्र आश्चर्याची बाब अशी की या पाण्याचे व्यवस्थित नियोजन होत नसल्यामुळे सत्तरी तालुक्मयातील अनेक गावांना अजूनही टँकरनेच पाणी पुरवावे लागते ही शोकांतिका आहे.
टँकरमुक्तीसाठी सरकारने प्रयत्न करावे!
सत्तरी तालुका टँकरमुक्त करण्याच्या दृष्टीकोनातून सरकारने प्रयत्न करावे अशी मागणी गेल्या दहा वर्षांपासून होत आहे. मात्र याबाबत अद्याप रितसर नियोजन झालेले नाही. यामुळे सत्तरी तालुक्मयातील जवळपास 17 गावांना अजूनही टॅकरद्वारेच पाणीपुरवठा केला जातो. याबाबत नागरिकांत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
दाबोस पाणी प्रकल्पाची यंत्रणा सध्या सुरू आहे. सदर प्रकल्प 15 एमएलडी क्षमतेचा आहे?. हा प्रकल्प 25 एमएलडी क्षमतेचा करणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यक पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम पुढे नेणे अत्यंत गरजेचे आहे. पाण्याच्या प्रकल्पाची क्षमता वाढविल्यास सत्तरी तालुक्मयातील अनेक गावात निर्माण झालेले टँकरचे संकट दूर होणार आहे. तरीसुद्धा वेगवेगळय़ा ठिकाणी पाण्याचा साठा उपलब्ध आहे त्याठिकाणी छोटे-छोटे प्रकल्प उभारणे अत्यंत गरजेचे आहे.
माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी याबाबत प्रकल्पाची यंत्रणा कार्यान्वित केली. त्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या काळात या प्रकल्पाची यंत्रणा दहा एमएलडी क्षमतेने वाढविण्यात आली. सध्या हा प्रकल्प पंधरा एमएलडी क्षमतेचा करण्यात आलेला आहे. यामध्ये आणखी दहा एमएलडी क्षमतेची वाढ होणे अत्यंत गरजेचे आहे.
टँकरवर कोटय़वधीचा खर्च कशाला?
दरवषी कोटय़वधी खर्च करून सत्तरी तालुक्मयातील अनेक ग्रामीण भागांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. एवढा प्रचंड प्रमाणात खर्च करण्याचे कारण काय? असा सवाल सत्तरी तालुक्मयातील नागरिकांकडून व्यक्त होताना दिसत आहे. संपूर्ण सत्तरी तालुका टँकरमुक्त करण्यासाठी पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे. आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनीही यासाठी प्रयत्न करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.









