दिवसा देखील फ्लॅटमध्ये असतो काळोख
प्रत्येक माणसाला स्वतःच्या मनानुसार प्रॉपर्टी हवी असते. घर खरेदी करताना लोक तेथे पुरेसा प्रकाश आणि हवा खेळती आहे का हे पाहतात. परंतु सध्या एक असे घर 4 कोटींमध्ये विकले जातेय, ज्यात दिवसा देखील काळोख असतो. बाहेरून दिसण्यास हे घर सामान्य वाटते, परंतु आत पोहोचताच कोंडल्यासारखे वाटू लागते.
या दोन बेडरुम असलेला हा फ्लॅट प्रॉपर्टी मार्केटमध्ये दाखल झाल्यापासून इंटरनेटवर प्रसिद्ध झाला आहे. 4 लाख युरोंमध्ये म्हणजेच 4 कोटी रुपयांमध्ये विकल्या जाणाऱया या घरात सर्वकाही काळय़ा रंगाचेच आहे. याचमुळे हे घर अत्यंत रहस्यमय ठरते.

शहरी भागात असलेल्या या अपार्टमेंटचे डेकोरेशन 89 वर्षे जुन्या डेको स्टाइलमध्ये आहे. व्हिक्टोरियन मिल वेयरहाउसमध्ये असलेल्या या घराचे लोकेशन तर उत्तम आहे, परंतु हे घर भुताटकीचा आभास घडविणारे आहे.
हे अजब घर प्रत्येक कोपऱयातून डार्क कलर पॅलेटसारखे दिसते. घराला बॅटमॅनच्या गोथम सिटीच्या स्टाइलमध्ये सजविण्यात आले आहे. पूर्ण घर काळय़ा रंगात रंगविलेले असून त्यावरही काळय़ा रंगाचे डेकोरेशन करण्यात आले आहे. एवढेच नाही तर घरात सजविण्यात आलेली फुले देखील काळय़ा रंगाची आहेत.
घराचे बेडरुम देखील डार्क थीममध्ये असून काळय़ा उश्यांद्वारे त्याला पूर्ण करण्यात आले आहे. मॅचिंग फर्निचरसह येथे एक वेयरहाउस देखील आहे. ब्रिटनच्या सेंट्रल मँचेस्टरमध्ये नदर्न क्वार्टरमध्ये याची निर्मिती करण्यात आली आहे.
या प्रॉपर्टीसह पार्किंगची देखील सुविधा देण्यात येत आहे. तसेच या घराचा आकार 1 हजार चौरस फुटांचा आहे. घरात मॉडर्न ओपन किचन असून सुंदर वर्कटॉप देण्यात आला आहे. पूर्वी येथे वेयरहाउस होते, मग 1920 मध्ये आर्ट डेको स्टाइल स्पेसमध्ये त्याला रुपांतरित करण्यात आले. मागील वर्षापासून सोशल मीडियावर ही प्रॉपर्टी व्हायरल झाली आहे.









