पेज इंडियाज टॅलेंट ट्रेंड्सच्या अहवालामधून माहिती
मुंबई
आगामी सहा महिन्यांच्या कालावधीत जवळपास 86 टक्के कर्मचारी नवा रोजगार शोधणार असल्याचे संकेत एका सर्वेक्षणामधून व्यक्त करण्यात आले आहेत. सदर सर्वेक्षणात सर्व क्षेत्रातील वरिष्ठता आणि वयोमानानुसार स्पष्टीकरण देण्यात येणार आहे. हा बदल येत्या काळात पहावयास मिळणार असल्याचेही पेज इंडियाज टॅलेंट ट्रेंड्स 2022 या अहवालात सांगितले आहे.
सदरच्या सर्वेक्षणात भारतासह 12 एपीएसी बाजारांमधील 15 क्षेत्रांमधील 3,069 जणांच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. यामध्ये कर्मचारी बाजाराकडे कसे पाहतात आणि या वर्षाच्या दरम्यान कसे राहतात यावर प्रकाश टाकला आहे.









