वारणा नगर / प्रतिनिधी
कोडोली कोल्हापूर रोडवर कुशिरे येथे बिअर शॉपी जवळ चालत असलेल्या वृद्ध शेतकऱ्यांची पोलीस असलेल्या बहाण्याने जबरदस्तीने हातातील सोन्याचे तिरंग्या व गळ्यातील चेन 90 हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबवला. याबाबतचा गुन्हा कोडोली पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
कुशिरे येथील सदाशिव शंकर गुरव वय ७४ हे वृध्द शेतकरी घरापासून चारशे मीटर अंतरावर कोडोली कोल्हापूर रोडवर कुशीर येथे मोरे बिअर शॉपी जवळ यचालत जात असताना काळ्या रंगाच्या मोटर सायकलवरून आलेल्या दोघांनी गुख यांच्या आडवी मोटर सायकल उभा करून आपण पोलीस आहोत त्यांना पिवळ्या रंगाचे ओळख पत्र दाखवून थांबवले. त्यापैकी एकाने दात धरून हातातील ७, १० . ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या व १२ ग्रॅम वजनाची गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने काढून घेवून पोबारा केला. ही घटना सोमवार दि. १८ रोजी सायकांळी घडली.
याबाबत सदाशिव गुरव यानी कोडोली पोलीसात फिर्याद दाखल केल्यावर पोलीस यंत्रणा रवडबडून जागी झाली. पोलीसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करीत सहा.पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड यानी वेगवेगळी तपास पथके नेमूण तपास चालू केला आहे. मार्गावर असलेल्या ठिकठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर माहितींचा संदर्भ घेत तपासाला सुरवात केली आहे. घटनास्थळी शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधिक्षक रविद्र साळेंबे यानी भेट दिली असून तपास फौजदार सागर पवार करीत आहेत.