ऑनलाईन टीम/ तरुण भारत
अनेक दिवसांपासून राज्यात कोळसा तुटवडा असल्याने नागरिकांना भर उन्हाळ्यात लोडशेडींगचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. पण राज्यात सध्या कोळशाची टंचाई असताना देखील कुठेही गेल्या पाच दिवसात लोडशेडींग होऊ दिलं नाही. देशातील इतर बारा राज्यांमध्ये वीज टंचाई आहे. पण आपण राज्यात टंचाई होऊ दिली नाही, कोणताही भारनियमन लागू केलेलं नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत राज्याला वीज कमी पडू देणार नाही, असं आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत (nitin raut)यांनी दिलं आहे.
राज्यात कोळसा टंचाई आहे. पण मागील पाच दिवसात कोणताही भारनियमन लागू केलेलं नाही. राज्याला मोठ्या प्रमाणात विजेची गरज असतानाही आणि कोळसा संपण्याच्या मार्गावर असतानाही राज्याला विजेची कमतरता भासू देणार नाही. तसेच आपलं पहिलं असं राज्य आहे, ज्याने सर्वात आधी वीजेचे नियोजन केले आहे. राज्यात कोणतंही भारनियमन लागू करण्याचा विचार नाही. केंद्रातील ऊर्जा आणि कोळसा मंत्रालयाच्या नियोजनासाठी आमच्या बैठका होतात. त्यामुळे या बैठकीला आमचा पुढाकार नक्की आहे. कोळशाच्या उत्पादनाचे आणि रेल्वेच्या रॅकचे नियोजन असले पाहिजे, असे ते म्हणाले.
राज्यात कोशळाचा साठा कमी झाला आहे, असं राऊत म्हणाले. ऊर्जा विभागासंबंधी बाबी मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या आहेत. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात लोडशेडींग आहे. हरियाणा आणि पंजाबमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कट लावलेली आहे. पण महाराष्ट्रात आम्ही विजेटा तुटवडा भासू दिला नाही. आमची आर्थिक बाजू मुख्यमंत्र्यांना समजावून सांगितली आहे. राज्यात कोणतंही लोडशेडिंग होऊ देणार नाही, असं राऊत म्हणाले आहेत.