ऑनलाईन टीम / श्रीनगर :
काश्मीरच्या पुलवामा (pulwama) जिल्ह्यातील काकापोरा (kakapora) रेल्वे स्थानकाजवळ चहाच्या स्टॉलवर चहा पित असलेल्या रेल्वे संरक्षण दलाच्या जवानांवर दहशतवाद्यांनी रविवारी अचानक हल्ला केला होता. यात जखमी झालेल्या तीन जवानांपैकी दोघांना आज शहीद घोषित करण्यात आले.
एसआय देवराज (SI devraj) आणि हेड कॉन्स्टेबल सुरेंद्र सिंग (surendra singh) अशी शहीद जवानांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी काकापोरा रेल्वे स्थानकाजवळ चहाच्या स्टॉलवर चहा पित असलेल्या रेल्वे संरक्षण दलाच्या जवानांवर दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. यात तीन जवान जखमी झाले. या तिन्ही जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यापैकी दोघांना डॉक्टरांनी आज सकाळी शहीद घोषित केले.
दरम्यान, या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम राबविण्यात आली. या शोध मोहिमेत कुपवाडा येथून 10 पिस्तूल, 17 पिस्तुल मॅगझिन, 54 पिस्तुल राऊंड आणि 5 ग्रेनेड जप्त केले आहेत.









