18 दिवसांत 7 कोटी 65 लाख घरपट्टी जमा : 50 कोटी घरपट्टी वसुली करण्याचे उद्दिष्ट
प्रतिनिधी /बेळगाव
एप्रिल महिन्यात घरपट्टी भरणाऱया मालमत्ताधारकांना 5 टक्के सवलत देण्यात येत आहे. गेल्या 18 दिवसांत असंख्य मालमत्ताधारकांनी याचा लाभ घेतला असून, आतापर्यंत 7 कोटी 65 लाख 68 हजार घरपट्टी जमा झाली आहे. आणखी 12 दिवस या सवलतीचा लाभ मालमत्ताधारकांना मिळणार आहे.
2022-23 या आर्थिक वर्षात 50 कोटी घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. यापैकी 7 कोटी 65 लाख 68 हजारची घरपट्टी केवळ 18 दिवसांत जमा झाली आहे. एप्रिल महिन्यात आगाऊ घरपट्टी भरणाऱया मालमत्ताधारकांना करामध्ये 5 टक्के सवलत देण्यात येते. त्यामुळे इतकी घरपट्टी जमा झाली आहे. चलन घेण्यासाठी महापालिकेच्या विभागीय महसूल कार्यालयात गर्दी होत आहे. आणखी 12 दिवस या सवलतीचा लाभ मिळणार आहे. एरव्ही घरपट्टी जमा करण्यासाठी महापालिकेच्या महसूल विभागाला आटापिटा करावा लागतो. पण 5 टक्के सवलतीच्या योजनेमुळे एप्रिल महिन्यात 10 ते 12 कोटी घरपट्टी जमा होते.
एप्रिल महिन्यात घरपट्टी भरणाऱयांची संख्या मोठय़ा प्रमाणात असते. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे नागरिकांना वेळेत घरपट्टी भरता आली नाही. परिणामी सवलतीचा लाभ घेण्यात अडचण निर्माण झाली. त्यामुळे राज्य शासनाने 5 टक्के सवलतीच्या मुदतीत वाढ केली होती. याचा फायदा अनेक मालमत्ताधारकांना झाला.
10 ते 15 कोटी घरपट्टी जमा होण्याची शक्यता
तसेच कोरोना कालावधीत व्यवसाय मंदावलेला असतानादेखील मालमत्ताधारकांनी घरपट्टी भरणा केली. त्यामुळे महापालिकेला महसूल जमा झाला होता. तसेच विनादंड घरपट्टी भरण्याची मुदत दिली होती. त्यामुळेच मागीलवषी 80 टक्क्मयांहून अधिक घरपट्टी जमा झाली होती. फक्त एप्रिल महिन्यात 5 टक्के सवलत देण्यात येत असल्याने 10 ते 15 कोटी घरपट्टी जमा होण्याची शक्मयता आहे.









