अचूक बातमी “तरुण भारत”ची, सोमवार 18 एप्रिल 2022, सकाळी 11.10
● स्वॅब तपासणी 90 जणांची
● रिकव्हरी रेट 97.36
● पॉझिटिव्हीटी 1.11
● सक्रिय रुग्ण 4
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यातील नव्यानं होणारी बाधित वाढ रोखली गेली आहे. सलग दुसऱ्या दिवशी नव्याने एक बाधित आढळून आला आहे. सोमवारी सकाळी जाहीर झालेल्या अहवालात 90 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले आहेत तर काल सायंकाळपर्यंत 4 जण सक्रिय रुग्ण आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी 1.11 वर आहे.
4 सक्रिय रुग्ण
जिल्ह्यात नव्याने आढळून येणारे बाधित हे बरे होत आहेत. सक्रिय रुग्ण त्यामुळे अत्यल्प आहेत. काल सायंकाळपर्यंत जिल्ह्यात चार जण सक्रिय रुग्ण होते. ते घरच्या घरीच उपचार घेत आहेत. कोणीही करून मुक्त झाले नव्हते. ते जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक असून एप्रिल महिना हा महत्त्वाचा ठरू पाहत आहे. गेल्या 17 दिवसांमध्ये जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्याही दहाच्या आत राहिलेले आहे. सक्रिय असलेले रुग्ण ही ठणठणीत बरे होत आहे. गेल्या 17 दिवसात एकही कोरोना बाधित याचा मृत्यू झालेला नाही ही सुखद घटना आहे.
नव्याने जिल्ह्यात 1 जण बाधित
बाधित वाढ ही पूर्णपणे रोखण्यात आलेले आहे. आरोग्य विभागाने चांगले काम करून कोरोना पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश मिळवले आहे. एप्रिल महिन्यामध्ये गेल्या 17 दिवसात नव्याने होणारी बाधित वाढ ही शून्यावर आणण्यासाठी प्राधान्य राहिलेला आहे. रविवारी दिवसभरात जिल्ह्यात केवळ एक जण नव्याने बाधित आढळून आला.
सोमवारी
नमुने-90
बाधित-01
सोमवारपर्यंत
नमुने-25,75,934
बाधित-279227
मृत्यू-6683
मुक्त-271845









