वार्ताहर /माशेल
तिवरे येथील श्री शांतादुर्गा देवस्थानची बैठक नुकतीच होऊन पुढील तीन वर्षांसाठी नूतन समिती निवडण्यात आली. कमलेश नाईक गावकर यांची अध्यक्षपदी तर मंदार नाईक गावकर यांची सचिवपदी निवड करण्यात आली आहे.
खजिनदार विनोद नाईक गावकर, मुखत्यार सागर नाईक गावकर हे अन्य पदाधिकारी निवडण्यात आले. पर्यायी समितीचे अध्यक्ष कृष्णा नाईक गावकर, सचिव पद्मानांद उर्फ विजय नाईक गावकर, खजिनदार दत्तप्रसाद नाईक गावकर, उपमुखत्यार दिलीप नाईक गावकर यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी देवस्थानसंबंधीविविध विषयावर चर्चा करण्यात आली.









