जोपर्यंत तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन समोरून हालणार नाही – समरजितसिंह घाटगे
कागल/प्रतिनिधी
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या भाजप नेते समरजितसिंह घाटगे (samarjit singh ghatge) यांची तक्रार पोलीसांनी दाखल करून घेण्यास नकार दिल्याने कागल पोलीस (kagal police station) ठाण्यासमोर वातावरण तणावपूर्ण बनले . समरजितसिंह घाटगे यांनी पोलीस स्टेशन बाहेर येत , जोपर्यंत तक्रार दाखल करून घेतली जात नाही तोपर्यंत येथून हलणार नाही असा पवित्रा घेतला. शंभर कोटीचे अब्रूनुकसानीचे दावे लगेच दाखल होतात पण हा गुन्हा दाखल होत नाही. पोलीस प्रशासन दबावाखाली आहे असेही ते म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना घाटगे म्हणाले, पंचांगानुसार 24 मार्च 1954 रोजी रंगपंचमी दिवशी जन्मलेले नामदार हसन मुश्रीफ हे श्रीराम नवमीला आपला जन्म झाल्याचे सांगून बहुजन समाजाला गेली चाळीस वर्षे फसवत आहेत. आज त्यांच्या विरोधात मी तक्रार देण्यासाठी आलो असता पोलिसांनी चौकशी करून तक्रार घेतो. असे सांगून तक्रार घेण्यास नकार दिला आहे.
घाटगे म्हणाले, गोकुळ दूध संघामध्ये मंत्री मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद हे संचालक आहेत. वाढदिवसाच्या पुरवणीमध्ये गोकुळ दूध संघाने दिलेल्या जाहिरातीत हसन मुश्रीफ यांच्या नावात काही अक्षरांचा वापर करून ‘राम’ असा एकेरी उल्लेख केला आहे.
घाटगे म्हणाले, मंत्री मुश्रीफ यांनी आपल्या कारखान्याच्या मान्यतेसाठी दिलेल्या प्रस्तावातील पॅन कार्डवर व त्यांच्या वेबपेजवर त्यांची जन्मतारीख 24 मार्च 1954 अशी आहे. बहुजन समाजाला गेली चाळीस वर्षे ते फसवत आहेत. श्रीराम मंदिरासाठी पंधरा हजार रुपये राजेंनी दिल्याचे सांगून त्यांनी स्व. राजेंचा अपमान केला आहे. राम मंदिराच्या जागी आमचा वाडा होता हे विसरून चालणार नाही. तो वाडा पाडला आहे. मंत्री मुश्रीफ यांनी धर्मासाठी आपली एक गुंठातरी जागा दिली का? हे सांगावे. राममंदिरला दिलेले हे शासनाचे पैसे आहेत.
ते म्हणाले, मंत्री मुश्रीफ हे सोन्याचा खंजीर घेऊन जन्माला आले आहेत. त्यांना बोट धरून राजकारणात आणलेल्या स्व. राजे विक्रमसिंह घाटगे व आपला वारसा बाजूला ठेवून त्यांना आमदार केलेल्या स्व. खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला आहे. स्वर्गीय मंडलिक साहेब यांना तर त्यांनी वाळलेले पान आणि म्हातारा असे संबोधले होते. माझा विरोध साहेबांना नाही त्यांच्या प्रवृत्तीला आहे. बहुजनांमध्ये सहनशीलता आहे पण प्रभू रामचंद्रांची थट्टा कधीही खपवून घेणार नाही. असे ते म्हणाले.