नवी दिल्ली :
50 एमपी प्रायमरी सेन्सर कॅमेऱयासह मोटोरोलाने आपला नवा मोटो जी 22 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. एकदा चार्ज केल्यावर बॅटरी 37 तासापर्यंत बॅकप देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
सदरचा नवा फोन रेडमी 10, इनफिनीक्स नोट 11 एस, रियलमी सी 25 वाय आणि सॅमसंग गॅलक्सी एम 12 यांना टक्कर देईल. सदरचा फोन 4 जीबी रॅम व 64 जीबी इंटरनल स्टोरेजसह येणार असून 10 हजार 999 रुपये इतकी त्याची किंमत असणार आहे. कॉस्मीक ब्लॅक, आइसबर्ग ब्ल्यू आणि मिंट ग्रीन रंगात हा फोन खरेदी करता येणार आहे.

13 एप्रिलनंतर विक्रीस उपलब्ध
मोटो जी 22 हा स्मार्टफोन 13 एप्रिलला दुपारी 12 नंतर फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
वैशिष्टय़े पाहुया
w अँड्रॉइड 12 वर चालणार, डय़ुअल नॅनो सपोर्ट
w 6.5 इंचाचा एचडी प्लस मॅक्स व्हिजन डिस्प्ले
w 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 8 एमपी अल्ट्रा-वाइड शूटर, 2 एमपी डेप्थ सेंसर, 2 एमपी मॅक्रो शूटर, 16 एमपी सेल्फी कॅमेरा
w 64 जीबी स्टोरेजची व्यवस्था, मायक्रो एसडी कार्ड स्लॉटमार्फत 1 टीबी पर्यंत स्टोरेज करता येणार
w बॅटरी 5 हजार एमएएचची असणार, 20 वॅटचा बंडल्ड चार्जर









