प्रत्येक घरात भावंडांची मजामस्ती सुरू असते. तशीच सेलिब्रिटी बहिणभाऊ यांची दंगा आणि मस्ती सुरू असते. सारा अली खान आणि इब्राहिम अली खान यांचे अशाच मजामस्तीचे फोटो, व्हिडिओ सोशलमीडियावर शेअर करण्यात सारा नेहमीच पुढे असते. नुकताच साराने सिबलिंग्ज् डे निमित्त इब्राहिम आणि तिच्या नोकझोकचा व्हिडिओ इस्टापेजवर शेअर केला आहे. या व्हिडिओतून सारा आणि इब्राहिम यांच्यातील बाँडिंग तर दिसून येतच आहे पण त्यांच्यातील खटय़ाळपणाही चाहत्यांनी टिपला आहे. असाच सारा त्याची फिरकी घेत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. दोघांच्या हातात कप असल्याचे दिसतेय. त्यावरून लुटूपुटूच्या भांडणात इब्राहिम कॅरेमल ड्रिंक पित असल्याचे सांगतोय. त्यावर सारा असं म्हणतेय की, मी ब्लॅक कॉफी घेतली ज्यामध्ये दूधही नाही आणि साखरही. असं म्हटल्यावर इब्राहिम तिच्या या कॉफीवर नाक मुरडल्याची ऍक्शन करतोय. या सगळयामध्ये सारा बाहेर जाण्यासाठी रेडी होत असतानाच हम है तय्यार चलो गाण्याच्या ओळी गातेय.
संकलन – अनुराधा कदम









