प्रतिनिधी/ बेळगाव
आयुर्वेद शाखेचा अभ्यास भारतात फार पूर्वीपासून करण्यात आला आहे. आजही आयुर्वेद उपचारपद्धती आपले महत्त्व टिकवून आहे. आजच्या आधुनिक तंत्ज्ञानाच्या जगातसुद्धा आयुर्वेद जागतिक मान्यता मिळवून आहे, असे विचार बोर्ड ऑफ एथिक्स ऍण्ड रजिस्ट्रेशन डॉ. राकेश शर्मा यांनी व्यक्त केले.
केएलईच्या बी. एम. कंकणवाडी आयुर्वेदिक महाविद्यालयाच्यावतीने बीएएमएस आणि एमडी पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ केएलईच्या डॉ. बी. एस. जिरगे सभागृहात शनिवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून एनसीआयएसएम आयुर्वेद मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. एस. प्रसाद, काहेर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी, केएलई अकादमी ऑफ हायर एज्युकेशनचे कुलसचिव व्ही. ए. कोठीवाले उपस्थित होते.
कंकणवाडी आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहासकुमार शेट्टी यांनी संस्थेच्या वाटचालीबाबत माहिती दिली. डॉ. विवेक सावजी यांनी पदवीदान समारंभाचे उद्घाटन केले. अंतिम वर्षात प्रथम क्रमांक मिळविलेल्या डॉ. अक्षता आणि डॉ. पूजा, द्वितीय क्रमांकप्राप्त डॉ. अंजुम, डॉ. विद्याश्री यांना अनुक्रमे हिमालय, जीवक आणि आयुर्शारदा पुरस्कारांनी गौरविण्यात आले. डॉ. आदिवेश आणि डॉ. गीता गडाद लिखित ‘फार्माकोथेरप्युटिक्स ऑफ आयुर्वेदा इन ऑन्कोलॉजी’ पुस्तकाचे प्रकाशन झाले.
डॉ. विवेक सावजी यांनी सर्व पदवीधर विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून आपल्या पेशाशी एकनि÷ रहा, असे आवाहन केले. डॉ. व्ही. ए. कोठीवाले यांनी आयुर्वेदाचे महत्त्व स्पष्ट केले. डॉ. बी. एस. प्रसाद यांनी आयुर्वेद शाखेतील संधींबद्दल माहिती दिली. सर्व विद्यार्थ्यांना चरक शपथ देण्यात आली. एकूण 208 पदवीधर आणि 40 पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. डॉ. सुहासकुमार शेट्टी यांनी आभार मानले. याप्रसंगी बीओएसचे अध्यक्ष डॉ. प्रदीश शिंदे व डॉ. आर. एस. हिरेमठ, डीन डॉ. पी. जी. जाडर उपस्थित होते.









