प्रतिनिधी / पणजी
गोवा पोलीस खात्येचे नवे पोलीस महासंचालक (डीजीपी) जस्पाल सिंग यांनी काल गुरुवारी रितसर डीजीपी पदाचा ताबा स्विकारला. पेलीस मानवंदना देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. डीजीपी इंद्रदेव शुक्ला हे सेवा निवृत्त झाल्यानंतर जस्पाल सिंग (आयपीएस अधिकारी) यांची गोवा डीजीपी पदासाठी वर्णी लागली होती. काल गुरुवारी जस्पाल सिंग यांनी डीजीपी पदाचा रितसर पदभार स्विकारला.
जस्पाल सिंग यांची तिसऱयांदा गोव्यात बदली झाला आहे. सहाय्यक अधीक्षक म्हणून ते पहिल्यांदा गोव्यात आले होते. नंतर ते अधीक्षक होऊन त्यांनी गोव्यात सेवा बजावली त्यांनंतर ते पोलीस महानिरीक्षक म्हणून गोव्यात आले आणि आता ते पोलीस महासंचालक म्हणून गोव्यात सेवा बजावणार आहेत. वाहतूक विभाग, अमलीपदार्थ विरोधी विभाग तसेच जिल्हा अधीक्षक अशा विविध पदावर गोवा पोलीस खात्यात त्यांनी काम केले आहे.
गोवा हा शांतप्रीय प्रदेश असून येथे देश विदेशातील पर्यंटक येत असतात. पर्यटकांना आणि येथील लोकंसाठी पोलीस खात्याचा नेहमी आधार राहील त्यासाठी पोलीस खाते प्रयत्न करणार असे जस्पाल सिंग यांनी सांगितले. पदाचा ताबा स्विकारल्यानंतर पहिल्यांदाच ते पत्रकारांशी बोलत होते. पोलीस जनतेचे मित्र असणे नितांत गरजेचे आहे. जनतेला पोलिसांवर विश्वास असेल तरच ते पोलिसांकडे येतील. गोवा पोलीस हे तसे कठोर नाही ते सामंजस्याने वागतात. मात्र जर पोलिसांकडून काही घटना घडलेल्या आहेत तर त्या घडता कामानयेत पोलीस लोकांचे मित्र बनले पाहिजे असेही जस्पाल सिंग म्हणाले.
ड्रग्स व्यवहारातील केवळ छोटय़ा मोठय़ा ड्रग्स विक्रेत्यांना पकडून चालणार नाही तर ड्रग्स व्यवहारातील शेवटच्या माणसापर्यंत (मुख्य विक्रेता) पोचण्याचा प्रयत्न करू त्यासाठई आम्हाला एनसीबीची मदत आवश्यक आहे. असे जस्पाल सिंग म्हणाले.









