मुंबई :
आयटी क्षेत्रातील कंपनी टीसीएसचा समभाग मंगळवारी 2 टक्के वाढीसह 3 हजार 835.50 रुपयांवर बाजारात व्यवहार करत होता. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा समभाग इंट्राडेला 10 आठवडय़ाच्या उच्चांकावर पोहचला होता.
तिसऱया सलग दिवशी कंपनीचा समभाग 4 टक्क्यापर्यंत वधारलेला दिसला. 24 जानेवारी 2022 नंतर पुन्हा समभागाने वधारण्याचे धाडस केले आहे. 18 जानेवारी 2022ला कंपनीचा समभाग 4045 रुपयांवर पोहचला होता. येत्या सोमवारी 11 एप्रिलला संचालक मंडळाची बैठक होत असून त्यात मार्चअखेरचा तिमाही व आर्थिक वर्षाचा नफा तोटा जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते.
मंगळवारचे सत्र
आघाडीवरचे तेजीतले समभाग
कंपनी भाव तेजी टक्केत
टाटा पॉवर…….. 273.60….. 8.59
मेट्रोपॉलिस……. 2415.35 .. 8.02
पॉलीकॅब ………. 2654.45… 7.5
हॅवेल्स इंडिया … 1258.65… 6.64
जे. के. सिमेंट…… 2706.45… 5.72
घसरणीत आघाडी राखणारे समभाग
कंपनी भाव घट टक्केत
एसबीआय कार्ड . 839.00 …. 4.24
फेडरल बँक ……. 98.25 …… 4.15
एचडीएफसी बँक ……………. 1608.25 2.93
डेल्टा कॉर्प …….. 324.05 …. 2.88
बजाज फिनसर्व्ह 16,818.85 2.2









