सांगली/प्रतिनिधी
येत्या 10 एप्रिल ला रामनवमी आहे. त्यानिमित्त अयोध्येमधील काळाराम मंदिरात रामनवमी चा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे. याच उत्सवात रामनवमी दिवशी सांगलीतील अभिषेक काळे यांचे शास्त्रीय गायन होणार आहे.
अयोध्येतील राम मंदिरात रामनवमी दिवशी सेवा करणे हा मोठा भाग्याचा क्षण आहे, अयोध्येत जाऊन गायन करणारे अभिषेक काळे हे सांगली जिल्ह्यातील पहिलेच कलाकार आहेत. काळाराम मंदिरातील राम मूर्ती हिच अयोध्येतील रामाची मुख्य मूर्ती आहे. मुघल आक्रमणात जे मंदिर पाडले गेले त्याच या मुख्य मूर्ती आहेत. या मूर्ती आक्रमणानंतर काळाराम मंदिरात स्थापित केल्या गेल्या.
500 वर्षांपूर्वीच्या या मुख्य मूर्ती असून त्या समोर गायन सेवा करण्याचे भाग्य आपल्या सांगली जिल्ह्यातील सुपुत्राला मिळणे ही खूपच मोठी गोष्ट आहे.
गेले अनेक वर्ष राम मंदिर जागेचा चा विषय कोर्टात होता त्याचा निकाल लागल्यानंतर देखील कोरोनाच्या प्रभावामुळे अयोध्येत मोठा सांस्कृतिक कार्यक्रम होऊ शकला नाही. परंतु आता कोरोना निर्बंधातून संपूर्ण मुक्ती असल्याने अयोध्येत मोठ्या प्रमाणावर या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आणि राम मंदिर निकालानंतर इतका मोठा उत्सव होत असून रामनवमीच्या मुख्य दिवशी अभिषेक काळेंचे गायन होणार आहे.